जळगाव मिरर | १४ मार्च २०२४
न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल जळगावची इयत्ता सहावी वर्गाची रोजमीन रिजाऊल शेख चित्रकला स्पर्धेत विजेते पद मिळविले.
दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रंगरेज चित्रकला स्पर्धा माय एफ.एम.94.3 द्वारे शहरातील अनेक शाळांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील एकूण सात हजार विद्यार्थी सहभागी होते. या सात हजार विद्यार्थ्यांतून पहिल्या 12 विद्यार्थ्यांमध्ये इयता ६ वी वर्गाची रोजमीन रीजाऊल शेख रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम ची विद्यार्थिनी विजेती जाहीर झाली आहे. *माय एफ एम ने विद्यार्थ्यांना कलाक्षेत्राचे दालन खुले करून दिले अशा स्पर्धांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते
