
जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील पिंप्राळा -सावखेडारोड परिसरातील सोनी नगर,(मुरली मनोहर अपार्टमेंट) च्या मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा होवून त्यात पावसाचे पाणी साचल्याने जाणून काही जलतरण तलाव झाल्याचा अनुभव या परिसरातील नागरिकांना येवू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील सावखेडारोड येथे मुख्य रस्त्यावर खड्डे असल्याने पाऊस सुरु असून या पावसाचे पाणी या खड्ड्यात भरत आहे. त्यामुळे टू व्हीलर गाड्या, पाई चालणे कठीण झाले असून बऱ्याचदा दुचाकीसह पायी जाणारे या रस्त्यावर पडून दुखापत होत आहे. या समस्ये कडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातून नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे.





















