
जळगाव मिरर । ५ मे २०२३ ।
राज्यातील अनेक भागातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होवू लागली आहे. त्यानंतर लागलीच पोलीस यावर कारवाई करताना देखील दिसून येत आहे. नुकताच भाईंदर परिसरातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाईंदर पश्चिम येथील ठाकूर गली बाहेर एक दिव्यांग फळ विक्रेता केळी विकत असताना एका उर्मट तरुणाने चार केळी मोफत मागितली. मात्र, त्याने नकार दिल्याने तरुणाने त्याला मारहाण केली. हा तरुण सफाई कामगारा असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी या उर्मट तरुणाला अटक केली आहे.
४० सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचा एक स्वच्छता कर्मचारी रस्त्याच्या मधोमध एका अपंग फळ विक्रेत्याला मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या कचरावाहू वाहनात उपस्थित सफाई कामगाराने केळी विक्रेत्याकडे काही केळी मोफत मागितली होती.
#Maharashtra: मुफ्त में केला नहीं देने पर सफाईकर्मी ने दिव्यांग ठेलेवाले को पीटा pic.twitter.com/kAmDfIIRSa
— NDTV India (@ndtvindia) May 4, 2023
केळी न मिळाल्याने त्याने एका अपंग फळ विक्रेत्याला पाठीमागून लाथ मारली, जो त्याची गाडी ढकलत होता. त्यानंतर त्याला जमिनीवर ढकलले. दरम्यान, ही घडना घडत असताना आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून दिव्यांग व्यक्तीला वाचवले. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७९, ३२३, ४२७ आणि कलम ९२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.






















