जळगाव मिरर | ६ जून २०२५
भुसावळ तालुक्यातील हतनूरजवळ तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घटना दि ५ गुरूवार रोजी उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील विक्रम ठाकरे (वय २५, रा. चिचोल, ता. मुक्ताईनगर) हा बऱ्याच वर्षांपासून दारुच्या आहारी गेला होता. तो दारुच्या नशेत कोठेही पडून राहत होता. दारुच्या नशेत ४ जून रोजी हा रात्री ८ वाजेच्या सुमारास घरुन निघून गेला होता.
त्यानंतर ५ जून रोजी राजेंद्र सोमा वाघ यांने सांगितले की, सुनील विक्रम ठाकरे याने हतनुरच्या पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली आ हे. घटनास्थळी नातेवाईक गेले असता तेथे सुनील तापी नदीच्या पात्रात खडकावर मयत स्थितीत पडलेला होता. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी संदीप वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यासिन पिंजारी करीत आहेत.




















