
जळगाव मिरर | २३ जून २०२५
शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावात दि. २१ जून रोजी पत्नी मुलीसह माहेरी गेलेल्या होत्या, त्यामुळे घरी एकट्याच असलेल्या प्रमोद धनराज सोनवणे (वय ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतांना प्रमोद सोनवणे यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये ही रेकॉर्ड केले आहे. तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे प्रमोद सोनवणे हे पत्नी व मुलीसह वास्तव्यास होते. पेंटर काम करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. काही दिवसांपासून त्रूांची पत्नी आठ वर्षीय मुलीसह आसोदा येथे माहेरी गेलेली होती. त्या वेळी घरी एकटेच असलेल्या सोनवणे यांनी घराच्या समोरील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले व चावी शेजारच्यांकडे दिली. त्यानंतर त्यांनी मागील दरवाजाने घरात जाऊन आतून कडी लावून घेत घरात छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. गळफास घेण्यापुर्वी प्रमोद सोनवणे यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी छताला दोरी अडकविण्यापासून ते गळफास घेण्यापर्यंतची संपुर्ण घटना त्यामध्ये कैद झाली आहे.




















