जळगाव मिरर । १८ नोव्हेबर २०२२
भुसावळ-जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपांसमोर एका महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणावर दुपारी २ वाजेच्या सुमारास चाकु हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेला आदित्य कैलास सावकारे याच्यावर हिमालया पेट्रोल पंपांसमोर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड त्यांचे सहकारी प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, तुषार पाटील, मिलिंद कंक, अतुल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ड्रामा केअर सेंटर मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.