
जळगाव मिरर | ६ जून २०२३

यावल जवळ असलेल्या साकळी येथे भरधाव दुचाकी वाहनासमोर अचानक मोकाट गुरे आल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पंढरीनाथ नगरातील २५ वर्षीय तरुण डिगंबर संजय चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. मोकाट गुरांचा प्रश्न जीवघेणा ठरत असून गत अनेक वर्षांपासून पालिकांकडून हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. लोकांमधून ओरड झाल्यांनतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात येते. त्यानंतर संबंधित मालकही पुन्हा आपली जनावरे मोकळी सोडत असतात. अनेक ठिकाणी आता कोंडवाडेही दिसून येत नाही.




















