जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२४
शेतात पीकपेरा करुन घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दीपक उर्फ सागर भरत नेरपगारे (वय २७, रा. पिंपरखेड, ता. भडगाव) हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १३ रोजी एरंडोल भडगाव रस्त्यावरील पिंपरखेड गावाजवळ घडली होती. जखमी दीपकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांपासून त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज मंगळवारी अखेर अपयशी ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील दीपक उर्फ सागर नेरपगारे हा तरुण दि. १३ रोजी अत्माराम बडगुजर यांना घेवून शेतात पेक पेरा करण्यासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून तो बडगुजर यांना घेवून दुचाकीने घराकडे जात होता. दरम्यान, गावाजवळ त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०३, एडबल्यू – ७१४५) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सागर व शेतकरी बडगुजर हे गंभीर जखमी झाले. सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातली आणि त्यामध्ये सागरचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून गंभीर जखमी झालेल्या सागरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना दि. १७ रोजी त्याची प्राणज्योत मालवली. सागरचे वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दरम्यान, सागर हा तीन महिन्यांपुर्वीच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणांतर्गत तलाठी कार्यालयात कंत्राटीपद्धतीने नोकरी करुन तो कुटुंबाला हातभारल लावित होता