जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील खडके चाळमधील श्री.रामदूत हनुमान सांस्कृतिक व क्रीडा मंडळांच्या गणेशोत्सव-2022 च्या निमित्ताने श्री गणपतींना तब्बल १०८ पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला होता.यामुळे परिसरात 108 पदार्थांच्या नैवैद्यांची चर्चा सुरु होती. यावेळी गणेशभक्तांनी एकच जल्लोष करून बाप्पांची मनोभावे आरती केली.
शहरात गणेशोत्सवांमध्ये नेहमी सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवत गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच ठरत असते. त्याचप्रमाणे खडके चाळ मधील असलेले श्री.रामदूत हनुमान सांस्कृतिक व क्रीडा मंडळांने यंदा आगळावेगळा उपक्रम ठेवत गणपती बाप्पांना 108 पदार्थांचा नैवैद्य दाखविला आहे. यावेळी मंडळाच्या महाआरतीस विशाल भोळे यांची उपस्थिती लाभली होती. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने विविधता मे एकता ही थीम लक्षात ठेवून परिसरातील सर्व जाती-धर्माच्या लोकांकडून १०८ पदार्थ घेऊन त्याचा नैवेद्य बाप्पास अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला होता. यावेळी आरतीस मंडळाचे पदाधिकारी, महिला भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मंगेश शिंपी, मुकेश गायकवाड,पवन गायकवाड, मनोज गायकवाड, राहुल शिंपी,अंकुश कोळी, राकेश कोळी, शुभम भोसले, जितेश शिरसाठ, मयूर कोळी, गणेश रायसिंगे, हेमंत मोरे, पवन खोरे,राहुल चौधरी व ज्येष्ठ सल्लागार समितीतील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.