जळगाव मिरर | 29 मार्च 2024
भडगाव तालुक्यातील पथराड येथील अतुल नाना पाटील वय 24 हा आरोपी गेल्या तीन वर्षापासुन फरार असल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यता घेवुन गुन्हयाचे तपासकामी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुक काळात गुन्हयातील फरार असलेले आरोपींताचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेडडी यांनी सुचीत केले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री किसन नजनपाटील यांनी फरार असलेल्या आरोपीतांचा शोध घेणे बाबत पथक तयार करुन त्यांना सुचना देवुन शोध पथक रवाना केले होते.
फरार पाहीजे आरोपी शोध पथकातील सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोहेकों/अकरम शेख, पोहेको/ सुधाकर अंभोरे, पोना/राहुल जितेद्रंसिंग पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन त्यांनी गोपनिय बातमीची खात्री करुन सापडा रचुन चाळीसगांव शहर पो स्टे गुरन 311/2020 भादंवि कलम 379 मधील गेल्या तिन वर्षा पासुन फरार आरोपी नामे अतुल नाना पाटील वय 24 रा पथराड ता भडगांव जि जळगांव यास ताब्यता घेवुन गुन्हयाचे तपासकामी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला हजर केले आहे.