जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२५
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हि ‘पुष्पा२’ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर सध्या चर्चेत आली असून यानंतर ती अभिनेता विकी कौशलसोबत ‘छावा’ सिनेमात देखील झळकणार आहे. तसेच ती सलमान खानसोबत ‘सिंकदर’ सिनेमात देखील दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता सलमान आणि रश्मिकाची जोडी आणखी एका चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहे. रश्मिका मंदाना पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिग्दर्शक ॲटलीच्या आगामी ‘A6’ चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.
रश्मिकाचा ‘पुष्पा २’मध्ये ॲटली आणि सलमानला अभिनय आवडल्याने निर्मात्यांनी पुन्हा एकदा दोघांना एकत्र साईन करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ॲटलीने कंफर्म केले होते की, त्याच्या आगामी सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि रश्मिकाची या सिनेमात वर्णी लागल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘A6’वर काम सुरू असून लवकरच त्याची घोषणा होईल, असे सांगितले जाते.
रश्मिका मंदाना सध्या तिच्या ‘छावा’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री विकी कौशलसोबत दिसणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘छावा’नंतर ही अभिनेत्री बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत ‘सिकंदर’ चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे.