जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२३ ।
जगभरात प्रेमाच्या अनेक किस्से घडत असतात, गेल्या काही वर्षपासून लहानापासून ते वयोवृद्धापर्यत सर्वच सोशल मिडीयावर तासनतास लागलेले असतात. पण सोशल मिडीयावर समोरून कोण आहे हे कदापीही कळत नाही जर त्यांनी नाव बदलून काही केले असेल तर पण सध्या एक वेगळ प्रकरण समोर आले आहे. असंच एक प्रकरण रेडीट नावाच्या मन मोकळे करण्याचे साधन बनलेल्या साईटमुळे उघडकीस आले आहे.
या साईटवर लॉराने ( बदललेले नाव) म्हटलंय की ती 6 वर्ष एका तरुणासोबत डेटवर जात आहे. आपण जिथे जातो तिथे आम्हाला लोकं म्हणतात की तुम्ही दोघे सारखे दिसता म्हणून. यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या थक्क करणाऱ्या होत्या. या घडामोडींमुळेच लॉराची प्रेम कहाणी ही अजबगजब पद्धतीत मोडणारी ठरली आहे.
अनेकांनी तू आणि तुझा बॉयफ्रेंड सारखे दिसता असं सांगितल्याने लॉराच्या मनात संशयाचा किडा वळवळत होता. तिने तिची आणि तिच्या बॉयफ्रेंडची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. डीएनए टेस्टचा निकाल आला तेव्हा लॉराला धक्काच बसला कारण तिचा बॉयफ्रेंड हा तिचा भाऊच निघाला. ज्याच्यावर प्रेम केलं तो तरुण इतक्या लाखो-करोडों नागरिकांमध्ये आपला भाऊ का निघावा असा प्रश्न आता लॉराला पडला आहे. लॉराने म्हटलंय की तिला तिचा प्रियकर पहिल्याच भेटीत आवडला होता. लॉराप्रमाणेच तिच्या प्रियकरलाही दत्तक घेतलेले असल्याने तिला त्याच्याबद्दल विशेष आकर्षण होते. दोघांमध्ये मैत्रीसाठी हाच धागा कारणीभूत ठरला. या दोघांमध्ये वरचेवर चर्चा व्हायला लागली आणि हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लॉराने म्हटलंय की तिला आणि तिच्या प्रियकराला दोघांनाही चांगल्या कुटुंबांनी दत्तक घेतले होते. दोघांमध्ये चांगले नाते निर्माण झाले होते. लॉराने म्हटलंय की यापूर्वी तिच्या प्रियकरासारखी एकही व्यक्ती तिच्या आयुश्यात आली नव्हती जिच्याबद्दल तिला आकर्षण वाटले असेल.