जळगाव मिरर । २९ जानेवारी २०२३ ।
जिल्ह्यात प्रेम प्रकरणामुळे अनेक तरुणांना जेलची हवा खावी लागत असल्याच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना दिसत आहेत. जळगाव शहरातील एका तरुणाने चक्क पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्याच विवाहित मैत्रिणीला वारंवार मोबाईलवर फोन करून लग्न करण्यासाठी तिला संसार मोडण्यासाठी मुलाबाळांना मारुन टाकण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितेंद्र सुभाष पाटील (पुर्ण पत्ता माहित नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात 25 वर्षीय विवाहित महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या ठिकाणी ओळख असलेल्या एका मैत्रिणीने पती जितेंद्र पाटील यांच्या घटस्फोट घेतलेला आहे. हे विवाहित महिलेला माहित नव्हते. त्यामुळे जितेंद्र पाटील याने विवाहित महिलेशची ओळख निर्माण करून मोबाईलनंबर घेतला. पत्नीशी बोलायचे आहे असं सांगून वारंवार फोन करत होता. त्यानंतर मैत्रिणीचा आणि जितेंद्र पाटील यांचा घटस्फोट झाल्याचे विवाहित महिलेला समजले. त्यानंतर महिलेने मला कॉल करू नको, असे जितेंद्र पाटील याला समजावून सांगितले. परंतु याला न जुमानता जितेंद्र पाटील हा वारंवार विवाहित महिलेला फोनवर बोलण्यासाठी धमकी देत होता.
माझ्याशी लग्न कर, लग्न केले नाही तर मी तुझा संसार मोडून टाकेल, तुझ्याबद्दल तुझ्या पतीला बरे वाईट सांगून गैरसमज पसरवून टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव जितेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेंद्र पाटील यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.