• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नशिराबादचा सर्वांगीण विकास हाच ध्यास : ना. गुलाबराव पाटील

वाघुर नदीवरून नशिराबाद करांची तहान भागविणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
नशिराबादचा सर्वांगीण विकास हाच ध्यास : ना. गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे दिलेले अभिवचन लक्षात ठेवले असून याचमुळे अविरतपणे शहरातील विकासकामांना वेग दिलेला आहे. आज ६ कोटी रूपयांची कामे सुरू होत असून आगामी काळात यापेक्षाही व्यापक प्रमाणात कामे करण्यात येणार असून नशिराबादचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते नशिराबाद येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. आगामी काळात नगरविकास खात्याच्या माध्यमातून ५ कोटींची विकासकामे शहरात केली जातील अशी ग्वाही देतांना स्थानिक प्रशासनाने नशिराबादमधील कॉलनी भागातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर मुख्याधिकार्‍यांनी वाघूर धरणातून पाणी पुरवठा योजनेसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत. या माध्यमातून नशिराबादकरांची तहान भागविणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.*
याप्रसंगी शहरात ९ ठिकाणी विविध कामांचे भूमिपुजन करण्यात आले. लक्षणीय बाब म्हणजे ना. गुलाबभाऊ पाटील यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे ठिकठिकाणी अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून अडीच तासांपर्यंत चालेलेली त्यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली. यासोबत शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचा हा जिल्ह्यातील पहिला मोठा कार्यक्रम ठरल्याचेही दिसून आले. असून शिवसेना – भाजपा युतीचा गजर पुन्हा घुमत असल्याचे दिसून आले.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राज्याच्या हितासाठी आपण आपली राजकीय कारकिर्द पणाला लाऊन निर्णय घेतला आहे. हा निर्णय बरोबर की चूक ही जनताच ठरविणार आहे. नशिराबादच्या विकासासाठी आपण दिलेला शब्द पाळला असून याचमुळे आधी ग्रामीण रूग्णालयासह विविध कामांना गती आली असून यात आता नव्या सहा कोटीच्या कामांची भर पडली आहे. शहराचे ग्रामदैवत असणार्‍या झिपरूअण्णा देवस्थानासाठी अजून वाढीव निधीचा प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर आज नशिराबाद शहरातून एखाद्या विवाहाच्या वरातीपेक्षाही जास्त काळ चाललेली मिरवणूक हे जनतेच्या प्रेमाचे प्रतिक असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

मोटार सायकल रली व भूमिपूजन कार्यक्रम
ना. गुलाबराव पाटील यांनी नशिराबादच्या विकासकामांसाठी मोठा निधी प्रदान केला असून यातील अनेक कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. तर त्यांनी शहरात नवीन कामांना मंजुरी देखील मिळविली असून याच कामांचे भूमिपुजन आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आज सायंकाळी ६.०० च्या सुमारास ना. गुलाबराव पाटील यांचे शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांनी के.एस.टी शाळेजवळ ना. गुलाबराव पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार घोषणांनी स्वागत केले. येथून पेठ, सावता नगर, मुक्तेश्‍वर नगर, न्यू इंग्लीश स्कूल जवळचे स्वामी समर्थ केंद्र, आठवडे बाजारातील सिध्दार्थ नगर, भवानी नगर, वाचनालय फ्रूट सेल चौक, राम पेठ, राम मंदीर चौक, झिपरू अण्णा महाराज मंदिर मार्गाने ना. पाटील यांची रॅली काढण्यात आली. यात नऊ ठिकाणी त्यांच्या हस्ते नगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि झिपरूअण्णा महाराज देवस्थानाच्या पर्यटन खात्यातून मिळालेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या सुशोभीकरण , शहरा अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, पेव्हींग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट गटर बांधकाम, नशिराबाद – बेळी रस्त्यावरील पुलाची दुरूस्ती, वाचनालय बांधकाम, जिम्नॅनिशय हॉल बांधकाम अशा महत्वाच्या विविध कामांचे भूमिपुजन करण्यात आले. तर ना. गुलाबभाऊंचे ठिकठिकाणी अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. सुमारे अडीच तासापर्यंत नशिराबाद शहरात ठिकठिकाणी विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. यानंतर झिपरूअण्णा महाराज देवस्थानाच्या परिसरात मुख्य कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी पं.स. सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी ), डॉ. कमलाकर पाटील, तुषार महाजन; जागृती चौधरी, नरेंद्र सोनवणे, रमेशआप्पा पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, नगरसेवक पियुष कोल्हे, धरणगावचे माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, बाजार समिती संचालक अनिल भोळे, निलेश पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, योगेश पाटील, विकास धनगर, मंदिराचे विश्वस्त कैलास व्यवहारे, प्रदीप बोढरे, किरण पाटील, चंद्रकांत भोळे, चेतन बर्हाटे, कैलास नेरकर, किर्तीकांत चौबे , जयंत गुरव , ठेकेदार श्री शर्माजी , नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, बांधकाम अभियंता एम.के. फारूकी, पाणी पुरवठा अभियंता अतुल चौधरी, दौलत कुट्टे, संतोष रगडे, सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपअभियंता गिरीश सूर्यवंशी, शाखा अभियंता बी. टी. रायसिंग, उपअभियंता सुभाष राऊत , प्रकाश पाटील , जितु नारखेडे, अनिल पाटील, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा मंदिर ट्रस्ट तर्फे विश्वस्त कैलास व्यवहारे यांनी, न.पा. मार्फत मुख्याधिकारी रवींद्र सोनावणे यांनी , सार्वजनिक बांधकाम तर्फे उप अभियंता गिरीश सूर्यवंशी यांनी तर शिवसेना- भाजपा युती तर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भव्य नागरी सत्कार केला तेव्हा एकाच जल्लोष करण्यात आला.

या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बी.आर. खंडारे सर यांनी केले. प्रास्ताविक झिपरूअण्णा महाराज देवस्थानाचे विश्‍वस्त कैलास व्यवहारे यांनी प्रास्ताविकातून ना. गुलाबभाऊ पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्याने देवस्थानाचे सुशोभीकरण होणार असल्याने व नशिराबादच्या विकासाला गती मिळत असल्याने ना. गुलाबभाऊंचे आभार मानले. न.पा,चे लेखापाल संतोष रगडे यांनी आभार प्रदर्शन केले.

ना. गुलाबराव पाटील विकास पुरुष – मान्यवरांचे बोल
माजी सरपंच विकास पाटील यांनी आपल्या मनोगतातून ना. गुलाबराव पाटील यांच्या कामातून विकासकामांना गती मिळाली असून आगामी काळात वाकी नदीच्या घाटाचे बांधकाम आणि सुशोभीकरण, नशिराबादच्या पाणी पुरवठा योजनेसह पथदिव्यांसाठी सौर उर्जा प्रकल्प, शहरातील पायाभूत सुविधा, उद्यानांसह खुल्या भुखंडांचे सुशोभीकरण, व्यापारी संकुले आणि भाजी मंडई आदी कामे देखील गुलाबभाऊ यांनी मार्गी लावावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी आपल्या मनोगतातून ना. गुलाबरावजी पाटील यांनी आजवर नशिराबाद शहराच्या विकासासाठी भरीव निधी प्रदान केला असून ग्रामदैवत संत श्री झिपरू महाराज समाधी मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी प्रदान केल्यामुळे भाविक भक्तांची सोय होणार आहे. भविष्यातही याच प्रकारे ते विकासकामांना प्राधान्य देऊन ना. गुलाबराव पाटील सर्वांगीण विकास करतील याची खात्री असल्याचे म्हणाले. तर लालचंद पाटील, विकास पाटील व किर्तीकांत चौबे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी मनोगतातून ना. गुलाबराव पाटील हे वचन पूर्ण करणारे असून खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहे असा गौरोद्गार काढले .

या कामांचे झाले भूमिपुजन !
याप्रसंगी पर्यटन विभागातर्फे संत श्री झिपरू महाराज समाधी मंदिर परिसर विकास व सुशोभीकरण २ कोटी १३ लक्ष , नशिराबाद ते बेळी रस्त्यावरील गावाजवळील रस्त्याच्या पुलाची मोठी दुरूस्ती : मूल्य २० लक्ष ; १५ वा वित्त आयोगाच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे : मूल्य १ कोटी; न. पा. कर प्रणाली संगणीकीरण आणि अनुसूचीत जाती नवबौध्द घटक रस्ते कॉंक्रिटीकरण आणि बांधकाम : मूल्य ७० लक्ष रुपयांचे आदी कामांचे भूमीपुजन झाले.

अनुसुचित जाती आणि नवबौध्द घटकांची वस्ती योजनेच्या अंतर्गत धनगर खिडकी ते रमाई आंबेडकर नगर वस्ती भुमीगत गटर : मूल्य ४ लाख ९९ हजार; मातंग समाज वस्ती ते रमाई आंबेडकर नगर नगर रस्ता कॉंक्रिटीकरण : मूल्य ३ लक्ष ४ हजार रूपये; सिध्दार्थ नगर ते न्यू इंग्लीश स्कूल पोहच रस्ता : मूल्य ३ लाख ४ हजार रूपये; स्वातंत्र्य चौक ते सिध्दार्थ नगर रस्ता कॉंक्रिटीकरण : मूल्य ३ लक्ष ४ हजार रूपये; *दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत* मेहमूद झारे यांच्या घरापासून ते अब्दुल्ला बागवान यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य ३ लाख १८ हजार रूपये; रज्जाक बागवान ते युसुफ बागवान यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य ११ लाख ६७ हजार रूपये; एजाज अली यांच्या घरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य २ लाख ६५ हजार रूपये; अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत बादुमिया मोहल्ला कब्रस्थान संरक्षण भिंत बांधकाम : मूल्य सुमारे १२ लक्ष ५० हजार रूपये; मोमीन मोहल्ला कब्रस्थान संरक्षण भिंत बांधकाम : मूल्य सुमारे १२ लक्ष ५० हजार रूपये;

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत* भवानी नगर येथे जगन दामू नाथ ते योगेश माळी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण : मूल्य ७ लाख ६५ हजार रूपये; हनुमान मंदिर एरिया भवानी नगर पेव्हींग ब्लॉक बसविणे : अंदाजे मूल्य ४ लाख ३३ हजार रूपये या कामांचे भूमीपुजन होणार आहे. दलीत्तेतर वस्ती सुधार योजना २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. यात भवानी नगरातील सतीश चौधरी ते संदीप सुरवाडे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटारी आणि धापे बांधणे : अंदाजे मूल्य ४ लाख ३३ हजार रूपये; भवानी नगरातच अशोक माळी ते कमलाकर रंधे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे : मूल्य सुमारे २ लाख ५४ हजार रूपये; भवानी नगरात बेळी रोड ते उमाकांत वाघ यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे : मूल्य ६ लाख ८० हजार रूपये; गोपाळ भारूडे ते दिनेश पटेल यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण : मूल्य सुमारे ४ लाख २४ हजार रूपये या कामांचा समावेश आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांची वस्ती योजनेच्या अंतर्गत संजय रंगमले ते नथ्थू देवरे यांच्या घरांच्या दरम्यान रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य ४ लाख ९९ हजार रूपये तसेच पंढरी सोनवणे ते वाकी नदीच्या दरम्यान भूमिगत गटार बांधकाम करणे : मूल्य ४ लाख ९९ हजार रूपये या कामांचा समावेश आहे.

दलीत्तेतर वस्ती सुधार योजना २०२१-२२ अंतर्गत* मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुक्तेश्‍वर नगरात नितीन रंधे ते भैय्या बार्हे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य ६ लाख ८० हजार रूपये; मुक्ताईनगरात विजय रंधे ते अतुल महाजन यांच्या घरांच्या दरम्यान रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ३ लाख ३९ हजार रूपये या कामांचा समावेश आहे. याच योजनेत वरची आळी येथे जिम्नॅशियम हॉल बांधकाम करणे : मूल्य अंदाजे २५ लक्ष ७५ हजार रूपये; वरची आळी येथील सुपडू गेंदा रंधे ते विजय वाणी यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे : मूल्य ६ लाख ९४ हजार रूपये यांचेही भूमीपुजन करण्यात आले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाच्या अंतर्गत* न्यू इंग्लीश स्कूल ते स्वामी समर्थ केंद्राजवळ रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य १२ लाख ७६ हजार रूपये या कामाचे भूमीपुजन करण्यात येईल. याच योजनेच्या अंतर्गत सावता नगरात रस्ता कॉंक्रीटीकरण आणि गटार बांधकामे करणे : मूल्य २५ लाख ७३ हजार रूपये याचेही भूमीपुजन होणार आहे. याच योजनेच्या अंतर्गत बन्सी नाथ यांचे घर ते वाकी नदीच्या दरम्यान रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : ४ लाख २४ हजार रूपये; नशिराबाद पेठ येथे लेवा पंच मढी ते उमाळा रोडपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण : मूल्य ९ लक्ष ४५ हजारू रूपये; पेठ येथे रवींद्र पाटील यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : १० लाख २० हजार रूपये; विशाल चौधरी यांचे घर ते उमाळा रस्त्यापर्यंत कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य ११ लाख ९९ हजार रूपये या कामांचा समावेश आहे. तर दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत पेठ स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य ४ लाख ३३ हजार रूपये या सर्व कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

Related Posts

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!
जळगाव

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा
जळगाव

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ
जळगाव

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026
जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता
जळगाव

जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता

January 9, 2026
जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !
जळगाव

जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !

January 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026

Recent News

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group