• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध  ; मंत्री अनिल पाटील

1760 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध  ; मंत्री अनिल पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२४

राज्य शासनाने अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून या निधीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात केले.

महिला व बाल विकास कार्यालयामार्फत आयोजित महिला मेळावा आज अमळनेर येथील प्रताप कॉलेज येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच महिला उपस्थित होत्या.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

आज अमळनेर येथे 1760 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. राज्य शासनाने पाडळसरे धरणाकरीता 4890 कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील शेतीला बारामाही पाणी उपलब्ध होणार आहे. लोअर तापी प्रकल्प पाडळसरे अंतर्गत उपसा सिचन योजना क्रमांक 1 ते 5 चे भूमीपूजन आज होत असून यामुळे 25 हजार 657 हेक्टर जमीनीस पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे येथील शेती सुजलाम सुभलाम होणार आहे.राज्य शासनाने अमळनेरच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला असून गावागावात रस्ते, सिंचन,बंधा-याचे काम होत आहे. पुर्वी अमळनेर मध्ये दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. नगरोत्थान महाअभियान योजनेतंर्गत अमळनेर शहरवासीयांना आता 24 तास पाणीपुरवठा होणार आहे. असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, राज्य शासनाने महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळ हे नफ्यात आले आहे. शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. पाडळसरे धरणासाठी केंद्र सरकारमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच येत्या एक दोन महिन्यात पाडळसरे प्रकल्प हा बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ठ करण्यात येईल. गत दोन वर्षांत राज्य सरकारने अनेक विकास कामे केली असून जनसामान्यांच्या पाठीशी ऊभे राहणारे सरकार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या विकास कामांचे झाले भूमिपूजन

✅ लोअर तापी प्रकल्प पाडळसरे, ता.अमळनेर जि.जळगाव अंतर्गत उपसा सिंचन योजना 1 ते 5 मध्ये 25 हजार 657 हेक्टर जमीन सिंचनासाठी पाईपद्वारे पाणी पुरवठा वितरण नेटवर्कचे पंप हाऊससह बांधकाम करणे रु. 1010.19 कोटी.

✅ नगरोत्थान महाअभियान योजनेतर्गत अमळनेर शहरवासियांना 24 तास पाणीपुरवठा योजना 197.00 कोटी

✅ राष्ट्रीय महामार्ग 39 ते जांभोरा ढेकू सारबेटे हेडावे अमळनेर शिरसाळे तरवाडे वावडे मांडळ रस्ता प्रजिमा 51 कि.मी 47.68 कोटी

✅ हायब्रीड अन्युटी अंतर्गत आमलाड- मोड- शहादा- सांगवी – हातेड अमळनेर पारोळा रस्ता सुधारणा करणे 206.00 कोटी

✅ वावडे जानवे बहादरपूर पारोळा कासोदा रोड प्रजिमा 46 मि 14 ते 38/900 ची सुधारणा करणे 130 कोटी

✅ आपत्ती सौम्यीकरण कामे पूर प्रतिबंधक कामे, आर्च पुलाचे बांधकाम करणे, दुष्काळ प्रतिबंधक कामे अंतर्गत 110.54 कोटी

✅ मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत 58.99 कोटी रस्ता कामांचे अशी एकूण 1760.40 कोटी रुपयांच्या कामांच्या भूमिपूजन श्री.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
00000

Related Posts

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आ.चव्हाण
जळगाव

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आ.चव्हाण

June 13, 2025
पत्नीसोबत जेवण केले अन तरुण कामगाराने आयुष्य संपविले !
क्राईम

पत्नीसोबत जेवण केले अन तरुण कामगाराने आयुष्य संपविले !

June 13, 2025
उमाळा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !
क्राईम

उमाळा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

June 13, 2025
पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?
क्राईम

पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

June 13, 2025
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान
जळगाव

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

June 12, 2025
खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !
क्राईम

खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

June 12, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आ.चव्हाण

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आ.चव्हाण

June 13, 2025
पत्नीसोबत जेवण केले अन तरुण कामगाराने आयुष्य संपविले !

पत्नीसोबत जेवण केले अन तरुण कामगाराने आयुष्य संपविले !

June 13, 2025
उमाळा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

उमाळा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

June 13, 2025
पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

June 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group