बोदवड : प्रतिनिधी
बोदवड नगरपंचायतीस आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका दिली.
आज आमदार पाटील यांचे यांचे स्विय सहाय्यक प्रविण चौधरी यांनी महिंद्रा सुप्रो कंपनीची (एमएच19 सिवाय 8174) क्रमांकाची छोटे आक्सीजन सिलेंडरसह आधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहीका नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे याच्याकडे सुपूर्द केली. तसेच या संबंधीचे पत्र देखील श्री.चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना दिले. या रुग्णवाहीकेमुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांना फायदा होईल. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान, राजेश नानवानी, दिनेश माळी, गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, निलेश माळी, असलम बागवान, इरफान शेख, शांताराम कोळी, कलिम शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.