जळगाव मिरर | १ सप्टेबर २०२४
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील यश दीपक पाटील (वय १८) या मुलाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मुलाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात यश पाटील हा तरुण वास्तव्यास होता. त्याचे वडील मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास यश याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून यश याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, यश याने आत्महत्या का केली हे अस्पष्ट आहे. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.