जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरातील कसबा पिंप्री येथील रहिवासी नजीर मुराद तडवी (वय ६०) या प्रौढाला १४ नोव्हेंबर रोजी रात्री राज्य मार्ग क्र. ४६ वरील पोलीस पाटील समद आकोश तडवी यांच्या शेताच्या पश्चिमेस अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत नजीर तडवी हे दररोज सायंकाळी शेतात जात असून रात्री ते शेतातच झोपत. सकाळी उशिरापर्यंत नजीर तडवी घरी न आले नाहीत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. तेथे प्रथमदर्शी अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या ठिकाणी दुचाकीच्या समोरील लाईटाचे तुकडे पडलेले होते. त्यामुळे धडक देऊन दुचाकीस्वार फरार झाला असावा, अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, नातेवाईकांनी अपघात की घातपात असा संशय घेतल्याने या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तर मृतदेह उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातस्थळी पो. नि. किरण शिंदे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास पो. उपनिरीक्षक संजय बनसोड करत आहेत.