जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२४
नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन म्हणून दिलेले ५ लाख रुपये परत न देता त्याच्या मोबदल्यात खोटे दस्ताऐवज देवून गोपालसिंग भिमसिंग राजपूत (वय ६६, रा. पिंप्राळा) यांची फसवणूक केली. याप्रकरणी नाशिक येथील चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरात गोपालसिंग राजपूत हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त कर्मचारी आहे. गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या ठाणगाव येथे दोन प्लॉट पाहिले. त्यांना ते प्लॉट आवडल्याने त्यांनी प्लॉटसाठी दोन हजार २०० रुपये टोकन म्हणून दिले होते. त्यानंतर बुकिंगसाठी २ लाख ४० हजार ३९० रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या भागातील प्लॉट घेण्यासाठी २ लाख ५५ हजार रुपये दिले. असे एकूण ४ लाख ९५ हजार ३९० रुपये धनादेश व रोखीने दिले होते. मात्र प्लॉट देणाऱ्यांनी त्यांना खरेदीखत न देता त्यांनी राजपूत यांना प्लॉटचे खोटे दस्ताएवज गोपालसिंग राजपूत यांना आपल्याला प्लॉटच्या मोबदल्यात मिळालेली दस्ताएवज खोटे असल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित बिल्डरकडे त्यांनी टोकन म्हणून दिलेली रक्कम परत मागितली. परंतू ते रक्कम परत देत नसल्याने गोपालसिंग राजपूत त्यांनी लागलीच शहर पोलिसात तक्रार दिली. फसवणुक झालेल्या गोपालसिंग राजपूत यांनी पोलिसात तक्रार दिली. त्ययुसार नाशिक येथील वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सदर कंपनीचे संचालक प्रशांत एन. शेंडे (वय ५९), योगेश एन. शेंडे (वय ४८), व्यवस्थापक राजेंद्र वसंतराव खैरनार (वय ६१) सर्व रा. नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करत आहेत.