जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२४
राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा चांगलाच पारा वाढला आहे. त्यामुळे वन्य पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी नसल्याने जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून शहरातील अनेक ठिकाणी शेकडो पाण्याच्या कुंडीचे वाटप करण्यात येत आहे.
शहरातील ‘द फेण्ड्स ऑफ अनिमल्स’ या संस्थेच्या माध्यमातून माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्यातर्फे शहरातील अनेक चौका-चौकात व गार्डन परिसरात पशुपक्षासाठी या कुंडी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील पशुपक्षांना पाण्याची व्यवस्था भर उन्हाळ्यात होणार आहे. या उपक्रमाचे शहरातील पशुप्रेमीकडून डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचे कौतुक होत आहे.