जळगाव मिरर | २४ जून २०२४
भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी आणखी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात अटक झालेल्यांची संख्या आता सहा झाली आहे. नितीन पथरोड असे सहाव्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना २९ मे रोजी घडली होती. या गुन्ह्यात यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर सहावा संशयित नितीन पथरोड यास वरणगाव येथून अटक करण्यात आली.
या हत्याकांडप्रकरणी १० ते ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात रिपाईंचा जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया, करण पथरोड, किरण कोळी, विष्णू पथरोड या पाच जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अन्य संशयित फरार आहेत. बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरणगाव शहरांमध्ये साक्री फाटा येथे संशयित आरोपी नितीन पथरोड याला अटक केली. त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, जावेद शाह, सचिन चौधरी यांनी केली
