• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2025
in जळगाव
0
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’
Share on FacebookShare on Twitter

खेळ, शिक्षण आणि सर्जनशीलतेचा संगम, मनोरंजनातून मिळणार ज्ञानाचे दर्शन

जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२५

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम दि. १९ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा एड्युफेअर सर्व नागरिकांसाठी खुला असणार आहे. या तीन दिवसीय उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ८० पेक्षा अधिक गेम झोन आणि विविध आकर्षक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य जिल्हावासीयांना अनुभवता येणार आहे.

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी “मुलांनी उद्योजक बनावे” या दूरदृष्टीतून वेगळी व नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील उद्योगशीलता, सर्जनशीलता, नवकल्पनाशक्ती विकसित व्हावी, याच उद्देशाने दरवर्षी एड्युफेअर या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा सलग तीन दिवस चालणाऱ्या या एड्युफेअरची संकल्पना ‘खेळता खेळता शिका आणि शिकता शिकता खेळा’ अशी आहे.

एड्युफेअरमध्ये विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना चालना देणारे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमधील विविध खेळ आणि उपक्रम असणार आहेत. तसेच विज्ञान आणि गणित विषयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना देणारी मॉडेल्स व प्रयोग सादर केले जाणार आहेत. मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेतून विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, नृत्यकला यांचा सुरेख मिलाफ एड्युफेअरमध्ये अनुभवता येणार आहे. यामध्ये पपेट शो, नृत्य, संगीत सादरीकरणे हीदेखील प्रमुख आकर्षणे असणार आहेत.

खवय्यांसाठी खास ‘खाऊ गल्ली’

एड्युफेअरमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी उभारलेली खास ‘खाऊ गल्ली’ असणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे उपलब्ध असतील. त्यामुळे जळगावकरांना विद्यार्थ्यांच्या कौशल्याबरोबरच विविध चवींचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

एड्युफेअरमध्ये असणारी प्रमुख आकर्षणे

जादूचे प्रयोग, खाऊ गल्ली, लँग्वेज झोन, ८० पेक्षा अधिक अद्वितीय खेळ, रणपा बैलगाडी सवारी, घमाल पपेट शो, संगीत-नृत्य सादरीकरणे, सायन्स झोन, रोमन संस्कृतीचे दर्शन, ६०० पेक्षा अधिक हस्तकला वस्तू, मॅथ झोन, आरश्यांची दुनिया, अॅडव्हेंचर झोन, टॅलेंट शोसह विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम एड्युफेअरचे वैशिष्ट्य असणार आहे.

एड्युफेअर–२०२५ चे भव्य उद्घाटन दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पकता आणि कौशल्य पाहण्यासाठी नागरिकांनी या एड्युफेअरला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा अनिल जैन आणि प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले आहे.

Related Posts

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !
जळगाव

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !
जळगाव

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !
जळगाव

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

घरमालकाच्या घरातून चिलर व मोटार चोरले; दोन तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group