
जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२३
राज्यातील अनेक तरुण-तरुणी सरकारी नोकरी किवा खूप पगार असावा अशी प्रायव्हेट नोकरी मिळावी यासाठी अभ्यास करून परीक्षा देत आहे. अनेक ठिकाणी निघालेल्या भरतीमध्ये हि देखील एक भरती तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. सध्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने प्रशासकीय अधिकारी पदांच्या काही जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिर केली आहे. या भरती अंतर्गत विविध शाखेतील जवळपास १०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३
पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
लीगल स्पेशलिस्ट २५
अकाउंट्स/ फायनान्स स्पेशलिस्ट २४
कंपनी सेक्रेटरी ३
प्रशासकीय अधिकारी ऍक्च्युअरी ३
डॉक्टर २०
इंजिनिअर २२
ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट ३
एकूण रिक्त पदे – १००
शैक्षणिक पात्रता
लीगल स्पेशलिस्ट – ६० टक्के गुणांसह विधी पदवी + ३ वर्षांचा अनुभव.
अकाउंट्स/ फायनान्स स्पेशलिस्ट – ICAI/ ICWA किंवा ६० टक्के गुणांसह B.Com. किंवा M.Com.
कंपनी सेक्रेटरी – ६० टक्के गुणांसह पदवीधर + इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.
ऍक्च्युअरी – ६० टक्के गुणांसह सांख्यिकी/ गणित/ एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
डॉक्टर – ६० टक्के गुणांसह MBBS/ BAMS/ BHMS.
इंजिनिअर – ६० टक्के गुणांसह सिव्हिल/ ऑटोमोबाईल /मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ ECE/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इन्फॉर्मेशन सायन्स विषयात B.Tech/ B.E/ M.Tech/ M.E.
ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट – ६० टक्के गुणांसह कृषी पदवी/ पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा
खुला – प्रवर्ग २१ ते ३० वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी – १००० रुपये.
मागासवर्गीय/ PWD – २५० रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत बेवसाईट – https://uiic.co.in/