जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
देशात नेहमीच विविध कारणाने चर्चेत आलेली टेनिसपटू सानिया मिर्झां पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झां यांचे फोटो सोशल मीडियावर गेल्या आठवड्याभरापासून फिरत आहेत. ते बरेच व्हायरलही झाले असून ते पाहून अनेक लोक हैराण झाले आहेत. हे फोटो खरे आहेत, ते दोघं एकमेकांना खरंच डेट करतायत का की ते AI ने बनवलेत आहेत, असा सवाल सर्वांच्या मनात असून सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या फोटोंनुसार, ते दोघे एकमेकांच्या क्लोज, जवळचे दिसत आहेत. अशा परिस्थितीत व्हायरल होणाऱ्या या फोटोंमागचं सत्य काय आहे, ते फोटो खरंच खरे आहेत का हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. या फोटोंचं सत्य काय ते जाणून घेऊया.
खरंतर, व्हायरल फोटोमध्ये आपण पाहू शकतो की सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे पूलमध्ये असून ते एकमेकांच्या जवळ उभे आहेत. तर, दुसऱ्या एका फोटोंत सानिया मिर्झा आणि शमी काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांमध्ये सेल्फी घेताना दिसत आहेत.दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य विलसत आहे, ते पाहून हे फोटो अगदी खरे असल्याचे कोणालाही वाटू शकतं. पण खरं सांगायचं झालं तर हे सगळे फोटो फेक असुन ते AI द्वारे बनवण्यात आले आहेत. म्हणजे तुम्ही त्या दोघांचे आत्तापर्यंत जे जे फोटो पाहिले आहेत ते फेक, खोटे आहेत.
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेले हे सर्व फोटो फेसबूक युजरने शेअर केले आहेत. मात्र ते फोटो समोर येताच लोकांमध्ये एकच खळबळ माजली. ते फोटो पाहून त्या दोघांचं खरंच काही सुरू आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. मात्र याप्रकरणी सानिया किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणीच काही बोललं नाहीये, त्यामुळे या सर्व बातम्या म्हणजे केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट होतं.पण हे फोटो पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. फोटो खरे की खोटे, हे समजणं खरंच खूप कठीण झाल्याचं, एकाने लिहीलंय. तर हे फोटो नक्कीच फेक आहेत, असं दुसऱ्या युजरने लिहीलंय.