जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२५
तोंडाला रुमाल आणि हातात मोजे घालून मध्यरात्रीच्या सुमारास सहा दुकानांचे कुलूप तोडून अन् शटर उचकावून चोरट्यांनी दुकानांमधून ६ लाख २० हजार ८०० रुपयांची रोकड आणि चांदीचे शिक्के चोरुन नेत धाडसी चोरी केली. ही घटना सोमवार दि. २४ रोजी सकाळी उघउकीस एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराशेजारी असलेल्या मार्केटमध्ये घडली, चोरी करतांना चोरटा एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्री सहा दुकानांमध्ये चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न उपस्थित होवू लागले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराशेजारी असलेल्या मार्केटमध्ये नोमान शकील देशमुख (वय ३९, रा. सुप्रिम कॉलनी) यांचे न्यू. भारत केमीकल नावाने फिनाईल होलसेल डिस्ट्रीब्युर्टरचे दुकान आहे. त्यांच्याकडे सात महिला आणि दोन पुरुष असे एकूण सात जण कामाला आहेत. देशमुख हे नेहमी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवत असल्याचे त्यांच्यादुकानात काम करणाऱ्यांना माहिती आहे. त्यानुसार दि. २३ रोजी देशमुख यांनी ड्रावरमध्ये २ लाख ७५ हजार रुपये ठेवून त्याला लॉक लावून सायंकाळी साडेसात वाजता दुकान बंद करुन घरी निघून गेले. सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देशमुख यांना त्यांच्या ओळखीच्यांचा फोन आला. त्यांनी तुमच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून शटर अर्धवट उचकावलेले दिसत असल्याचे सांगितले. त्यानुसार देशमुख हे तात्काळ दुकानावर पोहचले. त्यांनी दुकानात जावून पाहणी केली असता, त्यांना काऊंटरवरील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता आणि ड्रॉवरचे लॉक तोडून त्यात ठेवलेली पावणेतीन लाखांची रोकड दिसून आली नाही.
दोन दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी त्याच मार्केटमधील गाळा क्रमांक २१ चे मालक रामकृष्ण लालसिंग पाटील (रा. निवृत्ती नगर) यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ४५ हजारांची रोकड तर गाळा क्रमांक ५४ मधील जे. के ट्रेडर्सचे मालक सुनिल ताराचंद काकानी (रा. टीएमनगर, सिंधी कॉलनी) यांच्या दुकानाचे लॉक तोडून शटर उचकावून चोरट्यांनी तेथून ३० हजारांची रोकड चोरुन नेली.
चोरट्यांनी दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर त्याठिकाणी सुमारे एक टन वजनाची ट्रॉलीला लावलेले टायर देखील चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. ही ट्रॉलीच्या खाली विटा लावून त्याचे टायर काढल्याचे सकाळी उघडकीस आली. ही ट्रॉलीचे वजन एक टनापेक्षा अधिक असल्यामुळे ते उचलण्याकरीता सुमारे आठ ते दहा जण लागतात. त्यामुळे चोरटे एक किंवा दोन नसून त्यांची आठ ते दहा जणांची टोळी असल्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
देशमुख यांच्या दुकानात कानात चोरी झाल्याने त्यांच्या दुकानासमोर लोकांची गर्दी जमा झालेली होती. त्यामध्ये त्या मार्केटमधील ग या मार्केटमधील गाळा असलेले राजेंद्र टेकचंद अग्रवाल (रा. महाबळ) यांच्या श्रुती इन्टरप्राईजेस या बेकरीच्या रॉ मटेरियल डिस्ट्रीब्युटर्सच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील टेबलाच्या लोखंडी ड्रॉवरमध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी १५ चांदीचे नाणे आणि अडीच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली होती




















