• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वाळूमाफियांची दंबगगिरी : प्रांताधिकाऱ्याना जीवे मारण्याचा प्रयत्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2024
in जळगाव, क्राईम
0
वाळूमाफियांची दंबगगिरी : प्रांताधिकाऱ्याना जीवे मारण्याचा प्रयत्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरात वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या एरंडोल प्रांताधिकाऱ्याना खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धक्कदायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणपासून अवघ्या 17 किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्‍वंभर शिरसाठ, पोलीसपाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले. तेथे 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले. मात्र, तेथो दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने मुसक्या आवळताच आणखी चार-पाच जण आले. त्यांना उपविभागीय अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी गायधनी यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावत आमचे काम करू द्या, असे सांगताच ट्रॅक्टरचालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यासह 10-12 अज्ञात मारेकर्‍यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पथकातील अधिकार्‍यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

श्री.गायकवाड यांची प्रमोद गायधनी, दीपक ठोंबरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी कसेबसे वाळूमाफियांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयितांनी दगडफेक केल्याने गायकवाड, गायधनी, ठोंबरे यांच्यासह कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत गायकवाड यांचा डोळा थोडक्यात बचावला. गायधनी यांच्या हाताला, कंबरेवर मुका मार लागला आहे. त्यांच्यावर एरंडोल येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी यांनी कासोदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, आकाश राजेंद्र पाटील, अमोल ( पूर्ण नाव माहित नाही ); राहूल ( पूर्ण नाव माहित नाही ); दादाभाऊ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि सागर ( पूर्ण नाव माहित नाही ) या सर्वांच्या विरोधात भाग ५, गुरनं ०१/२०२४ भादंवि कलम-३०७, ३५३, ३३२, ३२३, ३७९, १४३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल आ. नियम ४८ (७) (८) खाण आणि खनिज अधिनियम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांनी भेट देत जखमी अधिकार्‍यांची विचारपूस केली.

Tags: #jalgaonprantadhikarivalu mafiya

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group