जळगाव मिरर । २१ जुलै २०२३
राज्यात गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी आज दि. २१ रोजी जळगावात जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, राज्यातील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाला. यात किरीट सोमय्या हे अतिशय गलिच्छ पद्धतीने मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करतांना दिसत आहेत. कृपया करून या व्हिडीओची सत्यता तपासणी करण्यात यावी व नक्की यात दोषी कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. किंवा विनाकारण त्यांना बदनाम करण्यासाठी हा व्हिडीओ बनवला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी महिला आयोगाने याविषयी आपली भूमिका जाहीर करावी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासह राज्यपाल, राष्ट्रपती यांनी सुध या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी सिबीआय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जिजाऊ ब्रिगेड रस्त्यावर उतरून निषेध करेल याला सर्ववी प्रशासन जबाबदार राहील.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष लीना पवार, शहराध्यक्ष मनिषा पाटील ,कार्याध्यक्ष सुचिता पाटील, कांचन पाटील, शहर कार्याध्यक्ष करुणा गरुड शहर संघटक लीना पाटील जयश्री देवरे चारुशीला पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
