जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।
देशात गेल्या काही दिवसापासून महागाईने मोठा टप्पा गाठला आहे. त्यातच यंदाच्या आर्थिक वर्षाचे शेवटचे दोन दिवस बाकी असतांना सोन्यासह चांदीच्या दरात भाव वाढ पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जर तुम्ही सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आजचे दर नक्की तपासून घ्या.
आज 30 मार्च 2023 गुरुवारी सलग दोन दिवस घसरणीनंतर सराफा बाजार सोने-चांदीच्या दरात तेजी आली आहे. BankBazar.Com नुसार, सोन्याचे दर 210 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर चांदीचे दर 300 रुपयांनी वाढला आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोने 58,410 रुपयांना विकले जाईल. कालच्या (29 मार्च 2023) तुलनेत 210 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या 1, 8 आणि 10 ग्रॅमच्या किंमती अशा काही असतील.
22 कॅरेटचे दर
22 कॅरेट स्टैंडर्ड सोने 1 ग्रॅम – 5,563 रु
22 कॅरेट स्टैंडर्ड सोने 8 ग्रॅम – 44,504 रु
22 कॅरेट स्टैंडर्ड सोने 10 ग्रॅम – 55,630 रु
24 कॅरेट किंमत
24 कॅरेट प्योर सोने 1 ग्रॅम – 5,841 रुपये
24 कॅरेट प्योर सोने 8 ग्रॅम – 46,728 रुपये
24 कॅरेट प्योर सोने 10 ग्रॅम – 58,410 रुपये
चांदीचेही दर वाढले
चांदीचा दर कालच्या तुलनेत त्यात 300 रुपयांनी वाढ झाली असून आज 1 किलो चांदीची किंमत 76,000 रुपये आहे.