जळगाव मिरर | २१ मार्च २०२४
लोकसभा निवडणुकीची देशभर सर्वच पक्ष तयारी करीत असतांना नुकतेच दोन दिवसापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर राज्यातील विरोधकांनी आता थेट मनसेच्या ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत म्हणाले कि, निवडणुका आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेटिंग सुरू होते, अस म्हणत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र निर्माण सेना हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधणे हे दुर्दैवी असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसे भाजपसोबत महायुतीमध्ये समावेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून सेटिंग हा शब्द समोर आला आहे. कुणाची कुणासोबत सेटिंग आहे, हे आता भाजप आणि मनसेने जग जाहीर केले आहे. त्यामुळे याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नसल्याचे खासदार विनायकराव त्यांनी म्हटले आहे. ज्या पक्षप्रमुख प्रमुखांनी मनसैनिकांना नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याऐवजी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधलेला निघाला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असेच होत असून हे दुर्दैवी असल्याचे म्हणत खासदार विनायकराव यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जातेय. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील एक मतदारसंघ सोडण्याची भाजपची तयारी आहे. त्याचबरोबर याचा फायदा आगामी विधानसभा तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षांना होईल, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. यावरून आता खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर टीका केली आहे.