जळगाव मिरर | २२ जून २०२४
जामनेर पोलिस ठाण्यावर रात्रीच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात पोलिस निरीक्षकांसह आठ कर्मचारी गंभीर जखमी झाल्यानंतर आता शहरात परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अातापर्यंत १४ जणांना अटक करण्यात अाली असून हल्ल्यातील इतर संशयितांचा पाेलिस शाेध घेत अाहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पाेलिसांचा माेठा बंदोबस्त असल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप अाले असून अपर पाेलिस अधिक्षक कविता नेरकर जामनेरात तळ ठाेकून अाहेत. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी धनंजय वेरुळे यांनी जामनेरात भेट दिली. शुक्रवारी पाेलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात अाला. चिंचखेडा येथील बालकेवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील अाराेपीला भुसावळ येथून एलसीबीच्या पथकाने अटक केल्यानंतर आरोपीस आमच्या ताब्यात द्यावे. अशी मागणी करत हजारावर लाेकांचा जमाव पोलिस ठाण्यासमोर जमा झाला. या वेळी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक दगडफेक सुरू झाली. यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे, रामदास कुंभार, संजय खंदारे, राजू माळी, सुनील राठोड, रमेश कुमावत जखमी झाले.
जामनेर तालुक्यातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीला शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. शरद पवार यांनी २५ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सहा वर्षीय मुलीला आईसक्रीम कोन घेऊन देण्याचे अमिष आमिष दाखवून सुभाष उमाजी भिल-सोनवणे याने अत्याचार करून खून केल्याची घटना ११ जून रोजी घडली होती. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जमाव दगडफेक करीत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून छऱ्यांचे ३६ राउंड फायर करण्यात आले. तर भुसावळ रोडच्या कॉर्नरला व वाकी रोडच्या कॉर्नरला अशा दोन ठिकाणी जमावातूनही हवेत गोळीबार केला गेला.