जळगाव मिरर / २१ मार्च २०२३ ।
देशातील प्रत्येक नागरिकाचे कुठल्याना कुठल्या बँकेत खाते आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात नागरिकांचे SBI चे ग्राहक असाल आणि तिची बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणावर वापरत असाल, तर वर्षातून एकदा तुमच्या बचत खात्यातून काही कपात केली जाते.
या कपातीबाबत अनेकदा लोक बँकांमध्ये चकरा मारू लागतात. स्टेट बँकेनेही तुमच्या बचत खात्यातून 206.5 रुपये कापले आहेत, त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवहार न करता बँकेने हे पैसे का कापले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेक SBI खातेधारकांच्या खात्यातून 147 ते 295 रुपये कापले गेले आहेत. याचं कारण म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया युवा, गोल्ड, कॉम्बो किंवा माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्ड असलेल्या ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारते.
युवा डेबिट कार्ड, गोल्ड डेबिट कार्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, किंवा माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्डसह यापैकी कोणतेही डेबिट/एटीएम कार्ड वापरणाऱ्या लोकांकडून SBI वार्षिक देखभाल शुल्क म्हणून रु. 175 आकारते. या वजावटीवर 18% GST देखील लागू आहे, म्हणून रु. 31.5 (175 च्या रु. 18%) GST रकमेत जोडले गेले आहेत, म्हणून रु. 175 + रु. 31.5 अशी एकूण 206.5 रुपये शुल्क आकारले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्या बचत खात्यातून 206.5 रुपये का आणि कसे कापले? याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेलच.
