जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२४
देशातील अनेक राज्यात थंडीची लाट पसरली असून प्रत्येकजण शेकोट्या पेटवत आहेत. थंडीपासून बचाव होण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळा उपाय करत असतात. अनेकवेळा थंडीपासून स्वता:चे संरक्षण करण्यासाठी केलेले उपाय प्राणघातक ठरलेले आहेत.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क थंडीपासून बचाव करण्यासाठी काही व्यक्तींनी ट्रेनच्या डब्ब्यात शेकोटी पेटवली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, ट्रेनच्या डब्ब्यात दोन व्यक्ती शेकोटी पेटवून शेकोटी घेताना दिसत आहेत. दरम्यान शेकोटीची आग जळत असल्याचे पाहून एक व्यक्ती तिथे येथे आणि तो ही शेकोटी घेऊ लागतो. शेकोटीमुळे एक्सप्रेसमधील डबा धुराने भरल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील शेकोटी पेटवल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
A video of men standing around a bonfire in a moving train has surfaced. It was reported from Prayagraj bound Sangam Express. RPF later said the men seen in the video coukd not be traced. pic.twitter.com/k5phrJryDO
— Piyush Rai (@Benarasiyaa) January 18, 2024
मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडिओ मेरठहून प्रयागराजला जाणाऱ्या संगम एक्सप्रेसमधील आहे. हा धक्कादायक प्रकार ट्रेनमधील सहप्रवाशांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. विशेष म्हणजे जीआपीचे पथक तिथे पोहचताच शेकोटी पेटवणारे व्यक्ती तिथून फरार झाले. याआधीही घराबाहेर शेकोटी घेत असताना शेकोटीचा स्फोच झाल्याचा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला होता.
व्हायरल व्हिडिओ एक्स अॅपवरील(ट्वीटर)@Benarasiyaaया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या व्हायर व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळालेत. अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे.