जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२४
खान्देशातील नंदूरबार जिल्ह्यातील होळ शिवारात खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याने बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामेश्वरी इंद्रसिंग पावरा (७ वर्षे) व शंकर इंद्रसिंग पावरा (५ वर्षे, रा. रोहिणी, ता. शिरपूर, ह. मु. द्वारकानगर, नंदुरबार) असे मयत चिमुकल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बालके मंगळवारी सकाळी घराच्या बांधकामाच्या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीत पडले. दोन्ही बहीण भाऊ बराच उशीर होऊनही घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाल शहर पोलिसात हरविल्याची नोंद झाली. बुधवारी दुपारी त्यांचे मृतदेह सेप्टिक टैंकमध्ये आढळून आल् याबाबत इंद्रसिंग पावरा यांनी खब दिल्याने शहर पोलिसात आकस्मि मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.