जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
शहरातील एमआयडीसी पोस्टे हद्दीतील मुकुंद नगर लाठी शाळेच्या मागे मानेश्वर महादेव मंदिर असुन मंदिरातील महादेवाच्या पिंडास असलेले चांदीच्या मुकुटासह इतर दागिणे हे मंदिरासमोर राहत असलेल्या अरुण लक्ष्मण शेटे यांचे घरी ठवेलले असतात सण उत्सव असेल तेंव्हा मंदिरात पिंडास लावले जातात, फिर्यादी अरुण शेटे हे कुंटुबासह पुणे येथे मुलाकडे गेले असता घरात ठेवलेले महादेव मंदिराचे ६१,५००/- रु.किं.चे चांदीच्या मुकुटासह दागिणे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले म्हणुन एम.आय.डी.सी.पो.स्टे. गुन्हा रजि.नं.५०८/२०२५ बी.एन.एस. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (a) प्रमाणे दि.११/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी पोस्टे चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकातील पोउनि चंद्रकांत धनके यांचे अधिपत्या खाली १) प्रदिप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांचे पथक तयार करुन अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळा वरील तसेच येणा-या जाणा-या रस्त्याचे चौका चौकातील सीसीटीव्ही फुटेज चेक करीत सदर आरोपीतांचे चेहरे निष्पण केले.
पोलीस पथकाने तपासाची चक्र फिरवुन लागलीच सी.सी.टी.व्ही. फुटेज मध्ये निष्पन्न झालेले चेहरे प्रत्यक्षात उतरुन आरोपीतांना ताब्यात घेतले आरोपी नामे १) शाकीब शेख ताजुद्दीन शेख वय 24 रा. प्लॉट नं 10 रोकडे कॉम्लेक्स चे जवळ कासमवाडी जळगांव २) राहुल शेखर रावळकर वय-३२ रा. जाखनी नगर कंजरवाडा जळगांव यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे वरील साथीदारां सोबत चोरी केल्याचे मान्य केले आहे. आरोपी कडुन गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल हस्गत केला असुन आरोपी यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, पोलीस उप अधिक्षक श्री. संदिप गावीत सो. यांचे मार्गदर्शनाखाली व पोनि बबन आव्हाड यांचे सुचना प्रमाणे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांचे अधिपत्या खाली प्रदिप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी केली असुन पुढील तपास हा पोहेकॉ/गिरीश पाटील व पोकॉ योगेश घुगे हे करीत आहे.
