जळगाव मिरर / ७ एप्रिल २०२३ ।
गेल्या आठवड्यापासून सलग दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव घसरल्याचे दिसत आहेत. आज सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून आज सोन्याचा भाव हा 24 कॅरेट सोन्यासाठी 60,870 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. शुद्ध सोन्याच्या भावात सध्या मोठ्या प्रमाणात घट झाल्याची पाहायाला मिळाल्यामुळे सध्या ग्राहकांना सोनं खरेदीची उत्तम संधी मिळाली आहे. सोन्याचे भाव कमी झाल्यानं तुमच्या शहरातील किंमतींनुसार तुम्ही सोनं खरेदी करू शकता तेव्हा या लेखातून जाणून घ्या की, तुमच्या शहरातील सध्याचे भाव किती आहेत.
1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे तेव्हा चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या भावांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 31 मार्च रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव हे वधारले होते. 60,000 रूपये असे दर होते. त्यानंतर 3 एप्रिलपासून हे भाव उतरताना दिसत आहेत. 3 एप्रिल रोजी सोन्याचे भाव हे 59,670 प्रतितोळा इतके होते. त्यानंतर अचानक सोन्याच्या दरात वाढ झाली आणि सोनं पुन्हा 60 हजारांच्या पार गेले. दोन दिवसांपुर्वी सोन्याचे दर हे 62 हजारांवर होते तेच आता 60 हजारांवर आले आहेत.
मागील महिन्याभरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा सरासरी 59,093 रूपये प्रतितोळा इतका होता तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 54,170 रूपये प्रतितोळा इतका होता. गेल्या 20 दिवसांमध्ये 22 कॅरेट सोनं हे 55,031 रूपये इतके होते तर 24 कॅरेट सोनं हे 60,033 रूपये इतके होते. गेल्या दहा दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,182 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,168 रूपये इतके होते.