जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२२
राज्यातील तरुणासाठी हि बातमी महत्वाची आहे. राज्यातील शासकीय व निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती होत आहे. त्यातील एक भाग म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ने पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँक जॉबसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली जाऊ शकते.
SBI ने 9 डिसेंबरपासून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले पात्र उमेदवार 29 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती अंतर्गत, सर्व पात्रता निकषांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बँकेच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल. रंतु स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या पदांसाठी किती पगार आहे हे माहित नसेल तर जाणून घ्या.
कोणत्या पदासाठी किती पगार आहे?
डेप्युटी मॅनेजर: 48,170 महिना
वरिष्ठ कार्यकारी: वार्षिक 24 लाख रुपये CTC
कार्यकारी: वार्षिक 20 लाख रुपये CTC
वरिष्ठ विशेष कार्यकारी: वार्षिक रु. 27 लाख CTC
डेटा प्रोटेक्शन ऑफिसर: वार्षिक 60 लाख रुपये CTC
असिस्टंट डेटा ऑफिसर: वार्षिक 35 लाख रुपये CTC
वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 63,840 महिना
वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 76,010 महिना
(हि बातमी आपल्याला माहितीस्तव देण्यात येत आहे. आपण वरील बातमीत दिलेल्या लिंक वर जावून संपूर्ण महिती घेवू शकतात.)