जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२४
राज्यातील बीड शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या गेवराईत उघडलीस आला आहे. अमोल खुणे हे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत. त्यांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना न्यायालय परिसरात मारहाण केली होती. गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाटा येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हल्ला करणारे आरोपी फरार झाले असून, या हल्ल्यात जखमी झालेल्या अमोल खुणे यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा मराठा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे, हल्ला करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करण्यात येत आहे. तलवाडा पोलीस ठाण्याच्या वतीनं घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.
