
जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३
राज्यात भरपूर वर्षांपासून असलेली मागणी म्हणजे औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ असे असावे यासाठी अनेक आंदोलन झाली पण अखेर केंद्र सरकारने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने दोन शहराचे नामकरण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशीव’ असं झालं आहे.
या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यांनी म्हटलं, “राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं करुन दाखविले…”
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 24, 2023
केंद्राच्या आदेशानुसार, औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं आहे. पण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव कायम राहणार आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव धाराशीव असं बदलण्यात आलं आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे.





















