• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2026
in राज्य, जळगाव, राजकीय
0
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मार्च २०२६

महाराष्ट्र् राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतुने मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आज मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले होते. या मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यामध्ये संकेतस्थळाचे आधुनिकीकरण, ‘आपले सरकार’ पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी, ई-ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर, डिजिटल डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ jalgaon.gov.in हे अद्ययावत व नागरिकाभिमुख स्वरूपात विकसित करण्यात आले असून ते मोबाईलसह सर्व उपकरणांवर सुसंगत करण्यात आले आहे. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर १९ अधिसूचित सेवा पूर्णतः ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्ज स्वीकृतीपासून सेवा वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘सेतूदूत जळगाव’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना २४x७ अर्ज स्थिती, तक्रार नोंदणी तसेच विविध योजनांची माहिती उपलब्ध होत आहे. तसेच जिल्हा स्तरावर विकसित करण्यात आलेला डिजिटल डॅशबोर्ड मुख्यमंत्री डॅशबोर्डशी एकात्मिक करण्यात आला असून विविध योजना व कार्यक्रमांची रिअल-टाइम माहिती उपलब्ध होत आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीद्वारे शासकीय गोदामांतील धान्य साठ्याचे रिअल-टाइम निरीक्षण, स्वयंचलित मोजणी व सुरक्षा देखरेख करण्यात येत आहे. तसेच GIS तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, जलस्रोत व पायाभूत सुविधांचा स्थानिक डेटाबेस तयार करण्यात आला असून नियोजन व संसाधन व्यवस्थापन अधिक अचूक झाले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे– हे यश जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे व समन्वयाचे फळ आहे. जिल्हा प्रशासनाचे हे यश समस्त जळगावकर नागरिकांना समर्पित आहे.

Related Posts

जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!
क्राईम

जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

October 28, 2026
सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !
क्राईम

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026
गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
जळगाव

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

October 28, 2026
जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
क्राईम

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

October 28, 2026
सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group