जळगाव मिरर | २१ मार्च २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात बीड येथील सरपंच खून प्रकरण मोठ्या चर्चेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. घरगुती हिंसाचाराच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवून पहिली पत्नी करुणा शर्माला महिना देखभाल खर्च देण्याच्या वांद्रे दंडाधिकाऱ्यांच्या अंतरिम आदेशाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचसंदर्भात याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणी आधीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केला आहे. सहा महिन्यात जास्तीत जास्त नऊ-दहा महिन्यांत मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा होणार, असा दावा करूणा शर्मा यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या विविध विषयांवर बोलल्या.
करूणा शर्मा म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगर कोर्टात आमदारकी रद्द होण्याची केस सुरू आहे. लवकरात लवकर त्याच्यावरही सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी जे खोटं ॲफेडेव्हिट दिलं आहे, त्यासाठी परळीमध्ये केस दाखल केली असून त्यांनी खोटी माहिती दिली असल्याचे करूणा शर्मांनी यावेळी म्हटले. तर त्या केस मध्ये चार तारखेला परत सुनावणी होणार आहे. जास्तीत जास्त सहा महिने नाहीतर नऊ दहा महिने नंतर धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा होईल, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
न्यायाधीश साहेबांनी पहिली बायको म्हणून मला पोटगी देण्याचे मान्य केले होते, ऑर्डर दिली होती. माझा नवरा धनंजय मुंडे आम्हाला दोन लाख द्यायला तयार नाही, त्यासाठी त्यांनी पिटीशन टाकले आहे. त्यावर आज सुनावणी आहे. घरच्या नोकराकडे चार-चार हजार कोटीची प्रॉपर्टी आहे. पण स्वतःच्या बायकोसाठी 27 वर्षे ज्यांनी आपले अस्तित्व लपवून ठेवले, त्या धनंजय मुंडेंकडे तिच्यासाठी दोन लाख रुपये सुद्धा नाहीत.
मला न्यायाधीश साहेबांवर आणि न्यायालयावर शंभर टक्के विश्वास आहे. मला शंभर टक्के न्याय भेटणार आहे, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, न्यायालय पूर्ण पुराव्यावर चालते. सगळे मंत्री लोक आपले नोकर-चाकर यांच्या नावावर प्रॉपर्टी करत असतात. त्यांना कुठे अडकायचं नसते. मी त्यांची बायको आहे. माझ्या नावावर त्यांनी काही घेतले नाही. मी शंभर टक्के त्यांची बायको होती, असे करूणा शर्मा म्हणाल्या.





















