
जळगाव मिरर / २० ऑक्टोबर २०२२
जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांची नुकतीच बदली झाली असून जिल्हयाच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी एम.राजकुमार हे जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदी रुजू होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एम.राजकुमार हे नागपूर लोहमार्ग येथून जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदाचा कार्यभार घेणार असून राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी दि.20 रोजी गुरुवारी रात्री उशिरा या बदलीचे आदेश काढले आहे.




















