भुसावळ : प्रतिनिधी
बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून ५० लाखांचा माल लांबवणाऱ्या नोकराला भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस व आरपीएफने मुद्देमालासह अटक केली. अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे प्रवास करत असताना चोरटा पकडला गेला. चौकशीत आरोपीने वेळेवर पगार होत नसल्याचे चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.
मालकाकडे काम करत असताना तब्बल 50 लाख रुपये घेऊन फरार झालेल्या एका परप्रांतीय तरुणाला अखेरीस भुसावळ रेल्वेस्थानकावरलोहमार्ग पोलीस आणि आरपीएफने मुद्देमालासह अटक केली. अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे प्रवास करत असताना पोलिसांनी या नोकऱ्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत (वय २५, मर्णेया, उमरकट, जि. मधुबनी, बिहार) हा कामाला होता. मालक पत्नीसह बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून राहुलने 19 ऑगस्टला दुपारी घरातील तिजोरी फोडली आणि सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल लांबवला. यानंतर त्याने सूरत गाठले. तेथे शनिवारी थांबवल्यावर राहुलने रविवारी सकाळी उधना येथून अंत्योदय एक्स्प्रेस बिहारकडे प्रवास सुरू केला.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच गांधी यांनी खारघर पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी बिहारकडे पसार होईल, अशी शक्यता वर्तवली होती. यानंतर खारघर पोलिसांनी स्थानिक लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणेला संशयिताची छायाचित्रासह माहिती पाठवली. ही माहिती मिळताच भुसावळ येथील लोहमार्ग आणि आरपीएफ यंत्रणा सतर्क झाली होती.
रविवारी दुपारी २.३० वाजता २२५६४ अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर येताच गाडीची तपासणी केली. त्यात जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या राहुलला ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्याच्याकडून सुमारे 43 लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, यांच्या पथकाने केली. चौकशीत आरोपीने वेळेवर पगार होत नसल्याचे चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.