जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२६
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि व्यापार आघाडी यांची संयुक्त बैठक आज जळगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजू मामा) तसेच भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार आघाडीचे अध्यक्ष अशोक राठी यांनी सविस्तर माहिती देत पक्षाच्या भूमिका व अपेक्षित मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. बैठकीच्या सुरुवातीस राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार साहेब तसेच ज्ञात-अज्ञात बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी संपूर्ण विश्वाचे निर्माणकर्ते भगवान विश्वकर्मा यांची जयंतीही साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बुद्धिजीवी आघाडीचे कार्यकारणी अध्यक्ष संजय नारखेडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. नीतू परदेशी तसेच व्यापार आघाडीचे विनय बाहेती यांनी आपापल्या कार्यकारिण्यांची घोषणा केली. या बैठकीस महिला आघाडी, युवा मोर्चा व व्यापार आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




















