जळगाव मिरर / ४ डिसेंबर २०२२
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जळगाव ” महिला मेळावा ” दि ६ रोजी मंगळवारी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांची उपस्थिती राहणार आहे.
हा मेळावा शहरातील बळीराम पेठेतील ब्राम्हण सभा येथे दि ६ रोजी मंगळवारी दुपारी १२ वाजता होणार असून यावेळी सौ वाघ हे महिलांचे विविध समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ दिप्ती चीरमाडे यांनी केले आहे.