जळगाव मिरर | ७ मार्च २०२४
देशात आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडतोय.या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
“मुंबईत आदर्श सोसायटी मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला.असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, “पण मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत, भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा,” अशी टीकाही शरद पवार यांनी केली.