जळगाव मिरर / १५ डिसेंबर २०२२
राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतेच थोर संता बद्दल अवमानकारक शब्द वापर करून थोर संताचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीतर्फे भाजपकार्यालय येथून सायंकाळी ४:३० वाजता निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नगरसेविका गायत्रीताई राणे, सुरेखाताई तायडे यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भाजप कार्यालय येथून घाणेकर चौक, येथून टाॅवर चौकात भव्य रिंगण करून सुषमा अंधारे व ठाकरे शिवसेनेचा धिकार असो अशा घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मराठे, राहुल वाघ निलाताई चौधरी, मनोज भांडारकर, शक्ति महाजन, अक्षय चौधरी, किशोर चौधरी, स्वप्निल साखळीकर युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी,अक्षय जेजुरकर,राहुल मिस्तरी विक्की सोनार, गजानन वंजारी, गौरव पाटील विविध आघाडीचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.