जळगाव मिरर । २० नोव्हेंबर २०२५
रात्री बाहेरगावाहून आल्यानंतर कारमध्ये झापलेले सोनू देवराम पाटील (वय ३०, रा. शिवाजीनगर) यांचा मृतदेह कारमध्ये मृतदेह मिळून आला. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास गवळीवाडा परिसरात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गवळीवाडा परिसरात रात्रीपासून एक कार रस्त्याच्या कडेला उभी होती. बुधवारी सकाळच्या सुमारास या कारमध्ये तरुणाचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ माजून गेली होती. घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनोद अहिरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीतून मृतदेह बाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.
दरम्यान, नातेवाईकांनी मयत रुग्णाची ओळख पटवली असून सोनू पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. रात्री बाहेरगावाहून आल्यानंतर घरी न जाता ते कारमध्येच झोपले होते. यावेळी गाडीतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















