जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४
चोपडा शहरातील रिद्धी सिद्धी कॉलनी परिसरात राहत असलेली संजना गुड्डू बारेला ही चार दिवसापासून बेपत्ता होती. दुर्दैवाने तिचा दि.२० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह धनवाडी रस्त्याजवळ असलेल्या पाट चारीत तरंगलेल्या अवस्थेत मिळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी गुड्डू बारेला मूळ रा रा तरडी ता. शिरपूर हा चोपडा शहरातील रिद्धी सिद्धी कॉलनी परिसरात पत्नी आणि मुलगी संजना (वय ९) मुलगा अजय (वय १२) यांच्यासह राहत होते. दि.१७ रोजी दुपारी संजना ही आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला जाते असे आईला सांगून गेली रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दाखल केली पोलिसांनी कसून तपास केला सामाजिक माध्यमांची मदत घेतली, मात्र ती मिळून आली नाही. अखेर चार दिवस उलटल्यानंतर आज दि.२० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह धनवाडी रस्त्याजवळ असलेल्या पाट चारीत तरंगलेल्या अवस्थेत मिळून आला. दुपारी येथील उपजिल्हा रुग्णालयात मयत संजनाचे शवविच्छेदन करण्यात येवून सायंकाळी तरडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.