जळगाव मिरर | ४ मार्च २०२५
महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दि.३ रोजी राजीनामा दिल्यानंतर आता या पदाची सूत्रे पुन्हा अजित पवार गटातील नेत्याकडे जाणार असल्याचे वृत्त असतांना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघातून अजित पवार गटाचे नेते अनिल भाईदास पाटील हे विजयी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांसह भाजपच्या काही आमदारांनी मंत्री मुंडे यांचा राजीनामा मागितला होता, त्यानंतर आज अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्री मुंडे यांनी आपल्या पीएच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा पाठविल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा माजी मंत्री व अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन या विभागाची मोठी जबाबदारी देण्यात आली होती व त्यांनी या पदावर मोठी कामगिरी देखील केली होती. तर दुसऱ्यांदा अमळनेर विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा बाजी मारल्यानंतर त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवून पक्षाची मोठी जबाबदारी दिली होती मात्र आता पुन्हा एकदा अजितदादा पवार हे आ.अनिल भाईदास पाटील यांना मंत्रीमंडळात पुन्हा घेवू शकतात. अशी देखील माहिती मिळत आहे.