जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३
देशाची राजधानी असेलेल्या दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दि. ३ ऑक्टोबर मंगळवार रोजी राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरुन गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी होती. ज्याचे केंद्र नेपाळमध्ये होते.
हरियाणामध्ये मंगळवारी दिवसभरात दुसऱ्यांदा भूकंप झाला. पानिपत, रोहतक, जिंद, रेवाडी आणि चंदीगड आदी भागात दुपारी 2.50 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अराजकता निर्माण झाली. लोक घराबाहेर पडले. आज सकाळी सोनीपतमध्ये 2.7 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी 11.06 सेकंदांनी भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू सोनीपत असल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीच्या 8 किलोमीटर खाली हालचालींची नोंद झाली आहे.
हि बातमी अपडेट होत आहे.
#WATCH | Earthquake tremors felt across Delhi-NCR. Visuals from Noida Sector 75 in Uttar Pradesh. pic.twitter.com/dABzrVoyVw
— ANI (@ANI) October 3, 2023